दापोली : दापोली महावितरणचे सहाय्यक अभियंता संजय ओगले यांची बदली पुणे येथे झाली असुन महावितरण कार्यालय दापोली येथे सहाय्यक अभियंता म्हणुन कार्यरत असताना जालगांव आणि ब्राह्मणवाडी गावांमधील विजे संबधातील विविध प्रलंबित कामांपैकी काही कामे त्यांच्या पाठपुराव्याने व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सहकार्यातून प्राधान्याने करण्यात आली.
त्यांच्या कार्यकाळात त्यांनी गावाला केलेल्या सहकार्याबद्दल त्यांचा संपूर्ण जालगाव गावसई च्या वतीने सत्कार करण्यात आला
यावेळी जालगांव गावसईचे उपाध्यक्ष रमेश कडू यांनी मनोगत व्यक्त करताना ओगले यांनी गावामध्ये केलेली विविध कामे आणि पदावर कार्यरत असताना गावाला केलेले सहकार्य याबद्दल त्यांना गावाच्या वतीने धन्यवाद दिले. गावामध्ये विजे संदर्भात विविध अडचणी होत्या त्याबाबत गावाने आंदोलनही केल होत. अनेक वेळा महावितरणचे अधिकारीआणि ग्रामस्थ यांच्यात वादविवाद सुद्धा झाले होते. परंतु महावितरणचे अधिकारी श्री. कुकडे आणि श्री. ओगले यांनी मनात कोणताही राग न ठेवता ग्रामस्थांच्या मागण्या रास्त असल्याने व ग्रामस्थ महावितरणला आवश्यक कायम सहकार्य लाभले. विजे संबंधी अडचणी समजावून घेतल्या आणि ग्रामस्थांच्या सहकार्यातून विजेचे अनेक प्रलंबित प्रश्न त्यांनी मार्गी लावले. दापोली महावितरण कार्यालयाच्या आज पर्यंतच्या इतिहासात असा सत्कार जालगांव ग्रामस्थांकडून पहील्यादांच होत असुन ते भाग्य श्री. ओगले यांना लाभल्याचे गावसई उपाध्यक्ष श्री. रमेश कडू यांनी सांगितले आणि सेवेतील उर्वरित कार्यकाळासाठी श्री. ओगले जालगांव गावसईच्या आणि ग्रामपंचायत च्या वतीने शुभेच्छा दिल्या.
सत्कारानंतर श्री. ओगले यांनी मनोगत व्यक्त करताना जालगांव आणि ब्राम्हणवाडी गावातील सर्व ग्रामस्थांचे आभार मानुन गावकऱ्यांच्या आणि वरिष्ठांच्या सहकार्यामुळे आपण चांगल काम करू शकलो याचा मला आनंद आहे असे सांगून, जालगांव गावसईने केलेला सत्कार माझा नसुन मला सहकार्य करणा-या माझे वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांचा आहे असे विदित केले, तसेच याठिकाणी काम करीत असताना खुप शिकायला मिळाले याचा उपयोग मला उर्वरित कार्यकाळात निश्चित होईल असे सांगितले.
यावेळी जालगांव गावसईचे अध्यक्ष श्री.अशोक जालगांवकर,माजी उपसरपंच विलास जालगांवकर,माजी उपसरपंच राजन चव्हाण, पो.पाटील धीरज कदम, शिरीष देसाई, ग्रामपंचायत सदस्य मयुर मोहीते, कुंभारवाडी अध्यक्ष संतोष वायकर, गावकमिटी सदस्य अनंत मोहीते, योगेश साटम, सहाय्यक अभियंता श्री. चव्हाण साहेब उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:17 17-06-2025














