अडरे : नदीचा प्रवाह उजवीकडे ठेवून नर्मदा प्रदक्षिणा करावी लागते. रोज सुमारे १५ ते २० किलोमीटर पायी प्रवास केला जात होता. या प्रवासामध्ये वाटेत चालणारे सहप्रवासी सर्व प्रकारची मदत करून सहकार्य करतात, अशी भावना चिपळुणातील विशाखा सदानंद चितळे आणि मानसी वामन जोशी यांनी व्यक्त केली.
चिपळुणातील गृहिणी विशाखा चितळे आणि मानसी जोशी या दोघींनी काही महिन्यांपूर्वी पायी नर्मदा प्रदक्षिणा पूर्ण केली होती. त्यांचा सन्मान आणि त्यांचे अनुभव कथन असा कार्यक्रम चिपळूणच्या ब्राह्मण सहायक संघातर्फे आयोजित करण्यात आला होता. यावेळी दोघींनी आपले अनुभव सांगितले.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला दोघींसह त्यांच्याशी संवाद साधणारे धनंजय चितळे यांनी श्रीदेव वीरेश्वराचे दर्शन घेतले. संघाच्या महिला विभाग अध्यक्ष सुरंगा अभ्यंकर आणि संघाच्या संचालक सदस्य रेखा बापट यांनी त्यांना सन्मानित केले. धनंजय चितळे यांचा संघाचे अध्यक्ष अविनाश पोंक्षे यांनी सन्मान केला.
मुलाखतीच्या आरंभी चितळे यांनी नर्मदा परिक्रमा का? आणि कशी करतात ते वर्णन केले. त्यानंतर विशाखा चितळे आणि मानसी जोशी यांनी आपला अनुभव सांगितले. त्या म्हणाल्या की, रोज १५ ते २० किलोमीटर पायी प्रवास केला जात होता. या मार्गावर असलेल्या आश्रमामध्ये दुपारी आणि रात्री भोजन, विश्रांती घेतली जात होती. सकाळी सर्व आवरून पूजन करून प्रवासाला सुरुवात होत होती. या प्रवासात सदैव मैयाचा जप स्तोत्र सुरू, असे त्यांनी सांगितले. वाटेत भेटणारे लोक प्रेमाने आदराने चहा, पाणी व नाष्ट्यासाठी बोलावीत असत. कोणीही पैशांची अपेक्षाही करत नसत. वाटेत सुंदर पवित्र ठिकाणे पाहावयास मिळाली, असे त्यांनी सांगितले. चिपळुणातील प्रकाश काळे यांनी गतवर्षी पायी नर्मदा परिक्रमा केली होती. त्यांचाही सन्मान संघ संचालक संजय जोशी यांच्या हस्ते करण्यात आला. कार्याध्यक्ष डॉ. मेहेंदळे यांनी आभार मानले.
प्रवासात सदैव मैयाचा जप स्तोत्र सुरू, असे त्यांनी सांगितले. वाटेत भेटणारे लोक प्रेमाने आदराने चहा, पाणी व नाष्ट्यासाठी बोलावत असत. कोणीही पैशांची अपेक्षाही करत नसत. वाटेत सुंदर पवित्र ठिकाणे पाहावयास मिळाली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:25 PM 17/Jun/2025














