चिपळूण : एका ७९ वर्षीय वृद्धेच्या पायाची शक्ती गेली होती. चालताना प्रचंड वेदना होत होत्या. त्यामुळे त्यांना रोजचे दैनंदिन व्यवहार करणे असाह्य झाले होते. म्हणून त्यांनी वालावलकर रुग्णालयातील मणका तज्ज्ञ डॉ. सुनील नाडकर्णी यांचा सल्ला घेतला. एम. आर. आय. तपासणी अंती असे आढळेल की छातीच्या पाचव्या मणक्याच्या मज्जारज्जुवर एक गाठ दाब देत होती. त्यामुळे अशी लक्षणे दिसत होती. या वृद्धा चंदनवाडी कोंडे, ता. चिपळूण येथून आल्या होत्या.
ही गाठ पाठीच्या कण्याला आक्रसून बसली होती. याशिवाय पाठीच्या खालच्या मणक्यात देखील गॅप तयार झाली होती. अश्यावेळी मज्जारज्जुची गाठ कौशल्याने अलगद काढणे आणि खालच्या स्तरावरील गॅप मधील मज्जातंतू मुक्त करणे हे दोन्ही कामे एकाच टप्प्यातील शस्त्रक्रियेत करण्यात आली. ही शस्त्रक्रिया पाच तास चालली आणि कोणतीही गुंतागुंत न होता पूर्ण झाली. शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला काही तासांनंतर शुद्ध आली. दुसऱ्या दिवशी आजींना कोणताही त्रास वेदना ना होता चालू फिरु लागल्या.
वालावलकर रुग्णालयातील मुख्य न्यूरो सर्जन डॉ. मृदुल भटजीवाले, मणका तज्ज्ञ डॉ. एकांक झा यांच्या नेतृत्वाखाली न्यूरोसर्जिकल पथकाला, डॉ. श्रेया तिबडेवाल आणि डॉ. सुधांशू राणे यांनी सहकार्य केले. डॉ. लीना ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली भूलतज्ज्ञ पथक डॉ. अस्मिता, डॉ. मनीषा आणि डॉ. नलिशा यांनी सहकार्य केले.
महात्मा ज्योतिबा फुले योजनेच्या पॅकेज अंतर्गत रुग्णाच्या दोन शस्त्रक्रिया पूर्ण विनामूल्य करण्यात आल्या. रुग्णांची अति जोखमीची शस्त्रक्रिया डॉक्टरांच्या कौशल्यामुळे आणि वालावलकर रुग्णालयातील अत्याधुनिक सुविधांमुळे सहज पार पडता आली. पूर्वी रुग्णांना न्यूरोसर्जिकल सेवेसाठी मुंबई, पुणे किंवा कोल्हापूरला लांबचा प्रवास करावा लागत होता. ते सर्व आता डेरवण येथे उपलब्ध करून देण्यात आले आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:59 PM 14/Oct/2024