दापोली : दापोलीतील उत्तम दर्जेदार शिक्षण देण्यासाठी प्रसिध्द असलेल्या सरस्वती विद्यामंदिर इंग्लिश मिडिअम स्कूलच्या नूतन प्रशासकीय कार्यालयाचे उद्घाटन प्रमुख पाहुणे प्रसिध्द सिने अभिनेते संजय नार्वेकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले तसेच श्रीनिवास रंगनाथ दांडेकर मुख्य प्रवेश द्वाराच्या नामफलकाचे अनावरण श्रीमती शरयु दांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले.
पाहुण्यांचे स्वागत शाळेच्या मुख्याध्यापिका सारीका गुजराथी यांच्या हस्ते शाल व श्रीफळ देऊन तसेच विद्यार्थ्यांनी स्वागतगीत व कथक नृत्याचे सादरीकरण करून करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी केले, याप्रसंगी शोभा दांडेकर, अॅड. महेश सागवेकर, शरयु दांडेकर यांनी शाळेत आयोजित केलेल्या कार्यक्रमाला मनोगतातून शुभेच्छा दिल्या व कौतुक केले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन उपस्थित असलेले संजय नार्वेकर यांनी आपल्या भाषणात दापोलीतील त्यांच्या बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला. तसेच शाळेच्या होत असलेल्या प्रगतीबद्दल कौतुक केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:08 PM 14/Oct/2024










