खेड : गेले दोन दिवस संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याच्या जोड रस्त्यावर बोगद्यापासून सुमारे २०० मीटर अंतरावर रविवारी सायंकाळी दरड कोसळली. त्यामुळे मुंबईच्या दिशेने जाणारी वाहतूक एकाच मार्गिकेतून सुरू करण्यात आली होती.
या मार्गावरील तब्बल २ तास वाहतूक विस्कळीत झाली हाेती.
या घटनेनंतर सुमारे दीड तासानंतर ठेकेदार कंपनीकडून दरड हटविण्यासाठी यंत्रणा पाठवून दरड हटविण्याचे काम सुरू केले. या घटनेची माहिती मिळताच कशेडी महामार्ग पोलिस मदत केंद्राचे पोलिस हवालदार शंकर कुंभार यांच्यासह सहकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
दरम्यान, कशेडी बोगद्याच्या जोड रस्त्यावर वारंवार होणाऱ्या घटना लक्षात घेऊन संबंधित खाते आणि ठेकेदार कंपनी यांनी आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास रात्री अपरात्री कशेडी बोगद्याच्या दोन्ही बाजूने टीम सज्ज ठेवणे गरजेचे आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:18 18-06-2025














