रत्नागिरी : पेठ किल्ला येथे झारखंडच्या कामगाराची गळफास घेऊन आत्महत्या

रत्नागिरी : शहरानजीकच्या पेठ किल्ला येथे झारखंडमधील कामगाराने राहत्या घरी अज्ञात कारणातून गळफास घेत आत्महत्या केली. ही घटना १७जून रोजी दुपारी १२.१५ वा. सुमारास उघडकीस आली. अरमानकुमार नरेश तुरी (वय २०, मूळ रा. झारखंड सध्या रा. पेठ किल्ला, रत्नागिरी) अरमानकुमार हा करुण्य कंपनीमध्ये कामाला होता. मंगळवारी दुपारी त्याने राहत्या घराच्या बाराला अज्ञात कारणातून गळफास घेतला.

ही बाब शहर पोलिसांना समजल्यावर त्यांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेहाचा पंचनामा करून उत्तरीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवला. या बाबत शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:29 AM 18/Jun/2025