राजापूर शहरातील उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू

राजापूर : शहरातील एसटी आगारासमोरील उडाणपुलाच्या एका बाजूकडील रखडलेले काम पूर्ण होऊन पुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू होण्यासाठी माजी नगराध्यक्ष अॅड. जमीर खलिफे आणि भाजपचे अरविंद लांबेकर यांनी केलेल्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. त्यांच्या प्रयत्नातून उड्डाणपुलावरून दुहेरी वाहतूक सुरू झाल्याने वाहनचालकांसह प्रवाशांमधून समाधान व्यक्त केले जात आहे.

महामार्गावरील राजापूर हद्दीतील बहुतांश कामे पूर्ण झाली आहेत. आगारासमोरील उड्डाणपुलाच्या एका बाजूकडील काम रखडले होते. त्यामुळे एका बाजूने वाहतूक सुरू होती.

पुलाच्या एका बाजूने जाणारी व येणारी वाहने मार्गक्रमण करत असल्याने अपघाताचा धोका होता. अॅड. खलिफे आणि लांजेकर यांनी महामार्ग विभागाकडे पाठपुरावा केला. गेल्या महिन्यात उड्डाणपुलाचे काम सुरू करण्यात आले. त्यावेळी कनिष्ठ अभियंता कुमावत यांनी कामाची पाहणी केली. आमदार किरण सामंत यांनी काही दिवसांपूर्वी महामार्गाची पाहणी करत उड्डाणपुलाच्या दोन्ही बाजूने वाहतूक सुरू करण्याच्या सूचना दिल्या होत्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:06 AM 18/Jun/2025