लांजा तालुक्यात पावणेआठ लाखांची हानी

लांजा : तालुक्यात पडलेल्या मुसळधार पावसामुळे १३ ते १७ जून या कालावधीत ७ लाख ७८ हजार ४०० रुपयांचे नुकसान झाले आहे. उपळे येथील चंद्रकांत वीर यांच्या गोठ्याचे २० हजार, भडे येथील संजय सुर्वे यांच्या गोठ्याचे २ लाख ८८ हजार, वाडीलिंबू येथील पांडुरंग मोरे यांच्या गोठ्याचे ३१ हजार, कोट आगरगाव येथील तुकाराम गोरूले यांच्या गोठ्याचे ४८ हजार ७०० रुपयांचे नुकसान झाले आहे. श्रीरामपूल येथे राष्ट्रीय महामार्ग ठेकेदार कंपनीने तयार केलेल्या पर्यायी मार्गामुळे येथील वहाळाला आलेले पुराचे पाणी घरात घुसून श्रीमती ईसानी यांच्या घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले आहे.

यामध्ये गहू, तांदूळ, गहूपीठ, फ्रीज, बेड, बेडवरील गाद्या यांचे सुमारे २५ हजार ५०० रुपयांचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीमुळे घरात पाणी घुसून मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. यामध्ये पानेरे येथील शांताराम चव्हाण यांचे ३५ हजार, गीतांजली मोरे यांचे ४४ हजार २००, शिवराम मोरे यांचे २७हजार, भागिरथी मौर्य यांचे २० हजार, नारायण नरसले यांचे १७ हजार ४००, अनिकेत नरसले यांचे ६८ हजार, सचिन नरसले यांचे ३८ हजार, प्रतिभा नरसले यांचे १४ हजारांचे नुकसान झाले आहे. साटवली येथील लक्ष्मण सोनू तरळ यांचे १४ हजार ५००, कृष्णा सदू तरळ यांचे ४१ हजार, सचिन तरळ यांचे ३४ हजार ५००, पुनस येथील सुरेंद्र भागवत यांचे ८६०० रुपये, गोळवशीतील रमेश वीर यांचे ३८०० रुपयांचे नुकसान झाले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:23 AM 18/Jun/2025