रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेचे नूतन मुख्याधिकारी तथा प्रशासक श्री. वैभव गारवे यांची रत्नागिरी शहर ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष श्री. सुभाष थरवळ आणि कार्याध्यक्ष डॉ. विजय निंबाळकर यांनी सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान ज्येष्ठ नागरिक संघांच्या नगरपरिषदेकडे प्रदीर्घ काळापासून प्रलंबित असलेल्या विविध प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी, मुख्याधिकारी श्री. गारवे यांनी ज्येष्ठ नागरिक संघाच्या प्रलंबित विषयांवर लवकरच सकारात्मक कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले. यामुळे ज्येष्ठ नागरिकांच्या अनेक वर्षांपासूनच्या समस्या मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:46 18-06-2025














