दापोली : हर्णे उपसरपंचपदी पूनम पावसे यांची निवड

दापोली : हर्णे ग्रामपंचायतीत झालेल्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीमध्ये उपसरपंच म्हणून पूनम पावसे यांची निवड झाली. या वेळी अध्यासी अधिकारी तथा हर्णे ग्रामपंचायत सरपंच व सर्व सदस्यांनी त्यांचे अभिनंदन केले.

सोमवारी (ता. १६) दुपारी २ वाजता अध्यासी अधिकारी सरपंच ग्रामपंचायत हर्णे यांच्या अध्यक्षतेखाली उपसरपंच निवडणुकीबाबत माहिती देण्यात आली. या वेळी सरपंच ऐश्वर्या धाडवे, महेश पवार, राकेश तवसाळकर, इस्माइल अ. अजीज ममन, सुशांत चौधरी, सना मुजम्मिल काझी, मयुरी गुरव, लतिका हवालदार, जयश्री दोकुळकर हे उपस्थित होते. उपसरपंचपदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले. त्यामध्ये पूनम पावसे व मानसी यादव यांनी अर्ज दाखल केले होते. मतमोजणीत पावसे यांना १० आणि यादव यांना २ मते मिळाली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 PM 18/Jun/2025