रत्नागिरी : शृंगेरी येथील शारदापीठ येथे संपूर्ण सातशे श्लोकांची श्रीमद्भगवद्गीता कंठस्थ परीक्षा घेतली जाते. या परीक्षेत स्वानंद पठण मंडळाच्या मीरा नाटेकर यांनी प्रथम क्रमांक पटकावला. त्यांना २१ हजारांचे पहिले पारितोषिक मिळाले, तसेच या परीक्षेत स्वानंद मंडळाच्या अश्विनी जोशी या सुद्धा उत्तीर्ण झाल्या आहेत. श्री शंकराचार्यांच्या हस्ते त्यांना सन्मानित करण्यात आले.
या परीक्षेसाठी भारत आणि भारताबाहेरूनही साधक येतात. या परीक्षेसाठी वयाची अट नसते. प्रत्येक साधकाची स्वतंत्र परीक्षा घेतली जाते. गीतेतील कोणत्याही श्लोकाची सुरुवात सांगितली जाते आणि तिथून पुढे श्लोकपठण करायला सांगतात, असे उलटसुलट कोणत्याही अध्यायातील कोणत्याही श्लोकांची परीक्षा घेतली जाते. यशस्वी साधकांना श्री शंकराचार्यांच्या हस्ते प्रसाद आणि प्रशस्तिपत्रक दिले जाते.
टिळक आळीमध्ये स्वानंद पठण ग्रुपमध्ये गेली अनेक वर्षे स्तोत्रपठण नाटेकर यांची अनेक संस्कृत स्तोत्रे पाठ आहेत. उत्तम उच्चारण आणि कोणत्याही श्लोकापासून सुरुवात केल्यावर त्या अध्यायातले पुढचे सगळे श्लोक सुस्पष्ट म्हणण्याची त्यांची तयारी हे बघून शृंगेरी मठ येथे त्यांचे कौतुक केले. नारायणी पठण मंडळाच्या विशाखा भिडे यांच्याकडे त्या सप्तशती शिकल्या. त्याचे पण शेकडो पाठ त्यांनी केले आहेत. त्याबद्दल नारायणी पठण मंडळाकडून त्यांचा सत्कार करण्यात आला. यापूर्वी शृंगेरी मठातर्फे गीतापठणात योजना घाणेकर यांना २१ हजारांचे प्रथम पारितोषिक मिळाले होते. तसेच उज्ज्वला पटवर्धन यांना १८ हजार आणि वंदना घैसास यांना १५ हजार रुपयांचे पारितोषिक मिळाले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:42 PM 18/Jun/2025












