रत्नागिरी : ऐन पावसाळ्यात एसटी विभागाचे वेळापत्रक कोलमडले आहे. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे. प्रवाशांना तासन्तास एसटीची वाट पाहावी लागत आहे. रत्नागिरी आगाराची स्वतंत्र एसटी बसेस राजापूर, लांजासाठी नसल्याची माहिती समोर आहेत. रत्नागिरीच्या इतर मार्गावर वापरल्या जात आहेत. त्यामुळे लांजा, राजापूरला जाणाऱ्या प्रवाशांना मोठा फटका बसत आहे. लांजा, राजापूरचे बसेसचे चालक-वाहक तेच जा-ये करीत असल्यामुळे डेपोवर लोड पडत आहे.
त्यामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. देवरूख, चिपळूणला स्वतंत्र रत्नागिरी आगाराच्या एसटी बसेस सुरू आहेत. मात्र लांजा-राजापूरसाठी का नाहीत, असा सवाल ही प्रवासी विचारत आहेत.
एसटी बसेस वेळेवर येत नसल्यामुळे दैनंदिन रत्नागिरी ते लांजा, लांजा-रत्नागिरीला कामानिमित्त ये-जा करणारे नोकरवर्ग, व्यावसायिक, शाळा-महाविद्यालयांची गर्दी मोठी असते. मात्र एसटी बसेस वेळेवर येत नसल्याच्या तक्रारी दिवसेंदिवस वाढत चालल्या आहेत. लांजा-रत्नागिरीसाठी सकाळी गाड्या आहेत. मात्र काहीवेळा वेळेत सुटत नाहीत. त्यामुळे प्रवाशांना वडापचा आधार घेवून रत्नागिरी गाठावी लागते तर संध्याकाळी कार्यालयीन वेळ बिघडत आहे. मात्र, रत्नागिरी आगारातून लांजा, राजापूरसाठी स्वतंत्र बस सोडत नसल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे जोपर्यंत राजापूर, लांजाची गाडी रत्नागिरीला येत नाही तोपर्यंत प्रवाशाला एसटीची वाट पाहावी लागते. त्यानंतरच ५ नंतर तब्बल पावणेसातची राजापूर एसटी बस सुटते. त्यामुळे प्रवाशांना ताटकळत थांबावे लागते. लांजा, राजापूरसाठी नवीन बसेस द्यावेत तसेच याकडे लांजा-राजापूरचे आमदार किरण सामंत यांनी विशेष लक्ष घालून रत्नागिरी आगारास आदेश द्यावेत, अशीच मागणी नागरिक करीत आहेत.
रत्नागिरी आगारातून या गाड्या धावतच नाहीत !
रत्नागिरी आगारातून कुणेश्वर सोडल्यास स्वतंत्र सिंधुदुर्गला गाडी धावत नाही. रत्नागिरीतून लांजाला जाणारी ८.४५ वाजताची शेवटची गाडी आहे. मिरजची एसटी रत्नागिरीत आल्यानंतरच रात्री पाली मार्गे लांजा धावते; अन्यथा वेळेवर न आल्यास रात्रीची गाडी रद्द होते.
रत्नागिरी आगाराची स्वतंत्र एस.टी. बस लांजा, राजापूरला नाही. लांजा डेपोची गाडी लांजा ते रत्नागिरी, रत्नागिरी ते लांजा असा प्रवास करते. त्यांच्याकडेच ही जबाबदारी दिली आहे. स्वतंत्र बस सोडण्याऐवजी त्यांना हा मार्ग दिला आहे. – बालाजी आडसुळे, आगार व्यवस्थापक, रत्नागिरी
प्रवाशांच्या सोयीसाठी लांजा व राजापूर मार्गावर एसटी बसेस धावल्या पाहिजेत. विशेषकरुन नोकरदार वर्ग व व्यावसायिकांना त्रास होणार नाही, याची काळजी एसटीने घेणे गरजेचे आहे. रत्नागिरी आगारातून सायंकाळी ६ ते रात्री ८ च्या दरम्यान जास्तीत जास्त व वेळेत गाड्या सोडाव्यात असे आदेश एसटी विभागाला दिले आहेत. – आमदार किरण सामंत, लांजा – राजापूर
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:32 PM 18/Jun/2025














