चिपळूण नगरपरिषदेची धडक कारवाई : अनधिकृत बांधकामाविरुद्ध डॉक्टरवर गुन्हा दाखल

चिपळूण : चिपळूण शहरातील महावीर पॅलेस, भोगाळे येथे डॉ. संभाजी परशराम गरुड यांनी केलेल्या अनधिकृत बांधकामाप्रकरणी अखेर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ च्या कलम ५२ व ५३ नुसार ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, १५ नोव्हेंबर २०२२ पासून ते आजतागायत डॉ. संभाजी गरुड यांनी महावीर पॅलेस या इमारतीमध्ये कोणतीही कायदेशीर परवानगी न घेता पत्र्याचे शेड, जिन्याचे बांधकाम, पाण्याची टाकी, युटिलिटी आणि कपाटाचे बांधकाम केल्याचा आरोप आहे.

चिपळूण नगरपरिषदेच्या मुख्य अधिकाऱ्यांनी प्राधिकृत केल्यानंतर, फिर्यादी विजय बबन गमरे (वय ३०, व्यवसाय: नोकरी, वरिष्ठ महाराष्ट्र प्रादेशिक व लिपिक, नगरपालिका चिपळूण) यांनी आज १७ जून २०२५ रोजी सायंकाळी ५.०२ वाजता चिपळूण पोलीस ठाण्यात येऊन याप्रकरणी तक्रार दाखल केली. या तक्रारीनंतर गु.र.नं. १४३/२०२५ अन्वये डॉ. संभाजी गरुड यांच्याविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

या घटनेमुळे शहरात अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारला जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 18-06-2025