खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथे पुलाला तडे..

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील कळंबणी येथे रस्ता खचला असून, वाळंजवाडी येथील ओढ्यावरील पुलाच्या दोन्ही बाजूला काँक्रीटला मोठे तडे गेले आहेत. हा रस्ता खचायला सुरुवात झाल्याने वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाल्याने रस्ता तत्काळ बंद करण्याची गरज निर्माण झाली आहे.

सद्यःस्थितीत स्थानिकांनी खबरदारी म्हणून महामार्गावर झाडाच्या फांद्या टाकल्या आहेत. ही घटना तीन-चार दिवसांपूर्वी घडली असली तरी रविवारी रात्रीपासून परिस्थिती अधिक बिकट झाली आहे. कळंबणी बुद्रुक गावाच्या हद्दीमध्ये वाळंजवाडी येथे महामार्गावरील ओढ्यावर असलेल्या पुलाच्या दोन्ही बाजूने तडे गेले आहेत. यामुळे पूल वाहतुकीला धोकादायक बनला आहे. या पुलाचे तडे पाहता वाहतूक ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:53 PM 18/Jun/2025