देवरुख, १७ जून २०२५: देवरुख पोलिसांनी गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगलेल्या एका व्यक्तीला रंगेहाथ पकडले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी ६ वाजता देवरुख मार्लेश्वर रोडवरील मौजे निवे खुर्द येथील स्मशानभूमीकडे जाणाऱ्या उघड्या जागेत झाडाच्या बाजूला घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत यशवंत जाधव (बक्कल नंबर ४९०) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, प्रवीण सीताराम आग्रे (वय ३७, रा. तुळसणी आग्रेवाडी, सध्या रा. श्रीमती जयश्री शांताराम नार्वेकर, हातीव, ता. संगमेश्वर जि. रत्नागिरी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आरोपी प्रवीण आग्रे याच्या ताब्यातून ८५० रुपये किमतीची ८ लिटर गावठी हातभट्टीची दारू कॅनसह जप्त करण्यात आली आहे. ही दारू तो विनापरवाना विक्री करण्याच्या उद्देशाने आपल्या ताब्यात बाळगून होता.
याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गु.र.नं. ६७/२०२५ अन्वये महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास देवरुख पोलीस करत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:50 18-06-2025














