रत्नागिरी : बेशुद्धावस्थेत सापडलेल्या व्यक्तीचा रुग्णालयात अखेरचा श्वास

रत्नागिरी शहर, १७ जून २०२५: रत्नागिरी शहरातील काँग्रेस भवन, दरबार हॉटेलसमोरील रस्त्यावर १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास बेशुद्धावस्थेत आढळलेल्या एका अनोळखी पुरुषाचा (अंदाजे वय ५५) सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, १६ जून रोजी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास सदर व्यक्ती बेशुद्धावस्थेत आढळल्यानंतर तेथील नागरिकांनी तात्काळ पोलीस आणि १०८ रुग्णवाहिकेला कळवले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत, १०८ रुग्णवाहिकेने त्या व्यक्तीला सायंकाळी ५.३० वाजता सिव्हिल हॉस्पिटल रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल केले.

हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी त्याच्यावर उपचार सुरू केले आणि पुढील उपचारासाठी त्याला पुरुष मेडिकल वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले. मात्र, १७ जून रोजी मध्यरात्री १२.१५ वाजता डॉ. कुणाल शर्मा (वैद्यकीय अधिकारी) यांनी तपासणी करून त्या अनोळखी व्यक्तीला मृत घोषित केले.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आमू. क्रमांक ५८/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 18-06-2025