रत्नागिरीत २० वर्षीय कामगाराची आत्महत्या : पेठकिल्ला परिसरात खळबळ

रत्नागिरी शहर, १८ जून २०२५: रत्नागिरी शहरातील पेठकिल्ला येथील कोरुण्य मरीन कंपनीजवळ एका २० वर्षीय कामगाराने गळफास लावून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अरमानकुमार नरेश तुरी (वय २०, मूळ रा. वेस्ट मांदीडीह, पो. सितुआ, थाना-तेतुलमारी, जि. धनबाद, झारखंड) असे मृत कामगाराचे नाव आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मंगळवारी (१७ जून २०२५) दुपारी १२ वाजण्याच्या सुमारास कंपनीतील काही कामगारांनी कार्यालयात काम करत असलेल्या व्यक्तीला माहिती दिली की, अरमानकुमारने टॉयलेटमध्ये गळफास लावला आहे. तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असता, अरमानकुमारच्या नातेवाईकांनी त्याच्या गळ्यातील गाठ सोडून त्याला खाली उतरवले होते आणि प्रथमोपचार देण्याचा प्रयत्न करत होते.

परंतु, अरमानकुमारला तातडीने वैद्यकीय उपचार मिळावेत यासाठी त्याला कंपनीच्या खाजगी वाहनातून रत्नागिरीच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी श्रेयल माईल यांनी तपासणी केली असता, अरमानकुमारचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.

याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात आमृ. क्रमांक ५९/२०२५, बी.एन.एस.एस. १९४ प्रमाणे आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अरमानकुमारने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:13 18-06-2025