शेतकऱ्यांनो सावधान! बनावट ‘बोल्टार’पासून सावध राहा!

◼️ सोमनाथ क्रॉप केअरची खरी ‘बोल्टार’ ओळखण्याची विनंती!

रत्नागिरी, १८ जून २०२५ : भारतीय फळ उत्पादक शेतकऱ्यांमध्ये अत्यंत लोकप्रिय असलेले आणि प्रभावी उत्पादन Boultar (Paclobutrazol 23%) च्या नावाचा गैरवापर होत असल्याने सोमनाथ क्रॉप केअर कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाचा इशारा जारी केला आहे. बाजारात अनेक कंपन्या ‘बोल्टार’ सारख्याच नावाचा वापर करून शेतकऱ्यांची दिशाभूल करत असल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे.

‘बोल्टार’ – नोंदणीकृत, मूळ आणि केवळ सोमनाथ क्रॉप केअरकडूनच!

सोमनाथ क्रॉप केअरने स्पष्ट केले आहे की, “Boultar” हे त्यांचे कायदेशीररित्या नोंदणीकृत ट्रेडमार्क आहे. हे उत्पादन फक्त सोमनाथ क्रॉप केअरच्या मान्यताप्राप्त उत्पादन युनिटमध्येच तयार केले जाते. Boultar (Paclobutrazol 23%) हे वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेले, प्रभावी आणि बाजारात यशस्वी ठरलेले उत्पादन आहे, जे फळझाडांच्या वाढ नियंत्रणासाठी शिफारसीय असून संतुलित वाढ आणि फुलोऱ्यासाठी उत्तम परिणाम देते.

शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा इशारा:

कंपनीने शेतकऱ्यांना सावध केले आहे की, अनेक कंपन्या ‘बोल्टार’ सारखेच नाव वापरून नकली उत्पादने विकत आहेत. त्यामुळे उत्पादन खरेदी करताना बाटलीवरील ट्रेडमार्क, सोमनाथ क्रॉप केअरचे नाव आणि संपूर्ण तपशील काळजीपूर्वक तपासण्याची विनंती करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी फक्त विश्वासार्ह आणि अधिकृत वितरकांकडूनच ‘बोल्टार’ खरेदी करण्याचे आवाहन केले आहे.

“नावात साम्य असले, तरी दर्जा आणि अधिकार फक्त सोमनाथ क्रॉप केअरकडेच आहे!” असे सांगत, कंपनीने शेतकऱ्यांना केवळ मूळ आणि खात्रीशीर ‘बोल्टार’ वापरण्याचा सल्ला दिला आहे.

अधिक माहितीसाठी, शेतकरी ९१७३६२०७२७ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात किंवा www.boultar.com या वेबसाइटला भेट देऊ शकतात.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:21 18-06-2025