खेड : तुंबाड येथील महाराजस्व शिबिरात ७० जणांना उत्पन्न दाखले

खेड : शासनाच्या विविध योजना लोकांपर्यंत पोहोचाव्यात, यासाठी प्रातांधिकारी शिवाजी जगताप, तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात ठिकठिकाणी महाराजस्व समाधान शिबीर अभियान राबवण्यात येत आहे. तुंबाड येथे आयोजित शिबिरात ७० जणांना उत्पन्न दाखले प्राप्त झाले.

तुंबाड येथील श्रीकृष्ण मंदिरात शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. राजवेलचे मंडळ अधिकारी राजाराम घुळे, सुजित गायकवाड, नवनाथ मोहिते, गंगाधर तांबे, श्रीधर पावसकर, तारका तांबे, हिरालाल माळी, प्रभाकर सोनावणे, सरपंच कदम, पोलीस पाटील आदी उपस्थित होते. शिबिराच्या यशस्वीतेसाठी नांदगावचे अरफात कादीर, कोरेगावचे संदेश साळुंखे, जयश्री हुमणे आदींनी प्रयत्न केले. मंदार आपटे यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:21 PM 18/Jun/2025