रत्नागिरी : दहावी आणि बारावीची पुरवणी परीक्षा येत्या 24 जूनपासून सुरू आहे. त्यासाठी सज्जता झाली आहे.
उच्च माध्यमिक आणि प्रमाणपत्र बारावीची लेखी पुरवणी परीक्षा 24 जून ते 16 जुलै आणि माध्यमिक शालांत प्रमाणपत्र दहावीची लेखी पुरवणी परीक्षा 24 जून ते 8 जुलै या काळात होणार आहे.
परीक्षांच्या कालावधीत परीक्षा केंद्रांवर होणारे गैरप्रकार रोखण्यासाठी तसेच कॉपीमुक्त अभियान राबविण्यासाठी दक्षता समितीची बैठक आज जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झाली. बैठकीला शिक्षणाधिकारी प्राथमिक बी. एम. कासार, शिक्षणाधिकारी योजना किरण लोहार, प्र. माध्यमिक शिक्षणाधिकारी सुनीता शिरभाते, पोलीस उपअधीक्षक राधिका फडके आदी उपस्थित होते.
श्रीमती शिरभाते यांनी यावेळी माहिती दिली. येत्या 24 जूनपासून होणाऱ्या पुरवणी परीक्षेसाठी 67 माध्यमिक शाळांमधील जिल्ह्यातील 140 विद्यार्थी 4 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत, तर 63 कनिष्ठ महाविद्यालयातील बारावीचे 333 विद्यार्थी 3 परीक्षा केंद्रांवर परीक्षा देणार आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:10 19-06-2025














