रत्नागिरी : देवरुख पोलिसांनी संगमेश्वर तालुक्यातील साडवली येथील सह्याद्रीनगर तिठा परिसरातून एका मटका अड्ड्यावर छापा टाकून एका व्यक्तीला अटक केली आहे. आरोपी कल्याण मटका नावाचा जुगार चालवत होता.
बुधवारी, १८ जून २०२५ रोजी सायंकाळी ४:२० वाजताच्या सुमारास, साडवली येथील एस.टी. पिकअप शेडच्या आडोशाला हा छापा टाकण्यात आला. देवरुख पोलीस ठाण्यात नेमणुकीस असलेले पोलीस कॉन्स्टेबल अमर कमलाकर घाडी (वय ३०) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
या कारवाईत पोलिसांनी ऋषिकेश भार्गव पुसाळकर (वय २८) याला कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रक्कम ५६०/- रुपये यासह ताब्यात घेतले. एकूण ५६२/- रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपी ऋषिकेश पुसाळकर हा स्वतःच्या फायद्यासाठी बेकायदेशीररित्या कल्याण मटका जुगार चालवत असल्याचे समोर आले आहे.
याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर ६८/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-06-2025














