गणपतीपुळे येथे मटका अड्ड्यावर छापा

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील प्रसिद्ध गणपतीपुळे येथे पोलिसांनी जुगारावर कारवाई करत एका व्यक्तीला अटक केली आहे. गणपतीपुळे येथील एसटी स्टँडच्या पाठीमागे, एका शेडच्या भिंतीजवळ हा मटका जुगाराचा अड्डा सुरू होता.

बुधवार, १८ जून २०२५ रोजी दुपारी ३:३० वाजताच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. जयगड सागरी पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस शिपाई अन्वी अनिकेत पुसाळकर यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.

या छाप्यात पोलिसांनी रमेश महादेव दुर्गावली (वय ६४) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून कल्याण मटका जुगारासाठी वापरले जाणारे साहित्य आणि रोख रक्कम ४५०/- रुपये जप्त करण्यात आली. रमेश दुर्गावली हा स्वतःच्या फायद्यासाठी विनापरवाना कल्याण मटका जुगार चालवत असल्याचे निष्पन्न झाले आहे.

याप्रकरणी जयगड सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक १८/२०२५, महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 19-06-2025