लांजा : जून महिना सुरू झाल्यानंतर तालुक्यातील खेरवसे जाधववाडीमध्ये विजेचा लपंडाव सुरू आहे. चार दिवस वीज गायब होत असून, त्याचा परिणाम हा नळपाणी योजनेवर होत आहे. पावसाळ्यातदेखील ग्रामस्थांचे पाण्याकडून हाल होत आहेत; मात्र वीज खंडित होण्यास नेमके कारण अद्यापही महावितरणला समजू शकलेले नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
खेरवसे गावात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. एकदा गायब झालेली वीज तीन-चार दिवस येत नसल्याने ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. रात्री गायब होणाऱ्या विजेमुळे तर लोकांना काळोखातून रात्र काढावी लागत असल्याने आणि मच्छरांचा होणारा उपद्रव सहन करावा लागत आहे. वीज नसल्याने त्याचा थेट परिणाम हा ग्रामपंचायतीच्या नळपाणी योजनांवर होत असून, पावसाळ्यात ग्रामस्थांवर पाणी पाणी करण्याची वेळ येत आहे.
याबरोबरच वाडीतील तीन ते चार वीजखांब देखील केव्हाही कोसळण्याच्या स्थितीत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 AM 19/Jun/2025














