पावस : रत्नागिरी तालुक्यातील खानू येथे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी नावीन्यपूर्ण बाबीअंतर्गत सरी वरंबा हळद लागवड प्रात्यक्षिकास भेट दिली. या वेळी खानू येथील महिला शेतकरी गटांना हळद लागवड तंत्रज्ञान याविषयी सदाफुले यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
रत्नागिरी तालुका कृषी अधिकारी विनोद हेगडे यांनी खरीप मोहीम २०२५ अंतर्गत राबवण्यात येणाऱ्या मोहिमांसंदर्भात उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. सदर गटांना पीएमफएमई योजनेंतर्गत लाभदेण्याच्या सूचना देण्यात आल्या.
तसेच जयदेव चव्हाण यांच्या प्रक्षेत्रावर जलकुंड कामांची पाहणी करण्यात आली. अस्तरीकरण पूर्ण करण्यासंबंधी सूचना देण्यात आल्या. कार्यक्षेत्रातील सर्व पी. एम. किसान लाभार्थ्यांचे अॅग्रीस्टॅक नोंदणी अनिवार्यपणे पूर्ण करण्याच्या सूचना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:03 AM 19/Jun/2025














