मंडणगड : तालुक्यातील पंदेरी भट्टीवाडी येथे सावित्री खाडीपात्रातील कांदळवन क्षेत्रातील खासगी जमीन मालकाने संरक्षित झांडाची मोठी तोड करून जमिनीचे सपाटीकरण केल्याचा गंभीर प्रकार पुढे आला आहे.
कांदवळन क्षेत्रातील खासगी मालकीच्या जमिनीच्या क्षेत्रात कांदवळवनाचे नैसर्गिक पद्धतीने अतिक्रमण झाले असल्यास शेतीचे कामांसाठी ती जमीन नव्याने विकसित करण्यासाठी प्रातांच्या पूर्व परवानगीने केवळ शेती कारणांसाठी ती विकसित करण्याची परवानगी मिळते. तशी परवानगी घेणे जमीन मालकांना बंधनकारक आहे. मात्र, सावित्री नदीच्या किनाऱ्यावर असेलल्या कांदळवनावर वाणिज्य कारणासाठी व घरे बांधण्यासाठी वापर करून अनेक ठिकाणी अतिक्रमणे होत असल्याची तक्रारी पुढे येत आहेत.
नुकतेच पंदेरी भट्टीवाडी येथे खाजन क्षेत्रातील कांदळवनाची मोठ्या प्रमाणात तोड करून जमिनीचा भराव करण्यात आला आहे. याशिवाय सावित्री खाडीपात्रात पाण्यामध्ये पक्के बांधकाम करण्यात आले ते कशासाठी करण्यात आले आहे याबद्दल प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत. या विषयी महसूल व वन विभागाकडे तोड व जमीन अतिक्रमाविरोधात अनेक तक्रारी होऊनही यंत्रणेने बघ्याची भूमिका घेतली आहे, असा आक्षेप ग्रामस्थांचा आहे. महसूल आणि वन विभाग हे दोन्ही विभाग एकमेकांकडे बोटे दाखवून यासंदर्भात कारवाई करण्यासाठी टाळाटाळ करून आपली जबाबदारी दुसऱ्यावर ढकलत असल्याने आरोप ग्रास्थांचा आहे. यंत्रणा कोणत्या कारणाने गप्प आहे, असा प्रश्न या निमित्ताने सर्वसामान्यांतून उपस्थित होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:26 AM 19/Jun/2025














