रत्नागिरी : शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त शिवसेना रत्नागिरी शाखेने आज जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे रुग्णांना फळांचे वाटप केले. या उपक्रमामुळे रुग्णांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला आणि शिवसेनेचा वर्धापन दिन सामाजिक भान जपत उत्साहात साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख बिपिन बंदरकर, माजी नगराध्यक्ष बंड्याशेठ साळवी, उप जिल्हाप्रमुख राजन शेटे, नगरसेविका कौशल्या शेटे, शहर संघटक पूजाताई पवार, उपशहरप्रमुख विजय खेडेकर, नगरसेवक विकास पाटील, विभागप्रमुख बाळू गांगण, संजय नाईक, मनोज साळवी, बाबू तळेकर, दीपक पवार, शहर संघटक सौरभ मनुष्य, युवा सेना शहरप्रमुख अभिजीत दुडे, दुर्वेश पांगम, आशु मोरे, विभाग प्रमुख संजय हळदणकर, नितीन लिमये, सतीश मोरे, महेंद्र झापडेकर, परेश साळवी, राहुल रसाळ, सुनील जगताप, स्वप्निल मयेकर, पप्पू सुर्वे, सुनील कीर, नगरसेवक बंटी कीर, नदाफ मौलवी, नलावडे, युवराज शेटे, राहुल रसाळ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सांगितले की, शिवसेनेने नेहमीच समाजसेवेला प्राधान्य दिले आहे. वर्धापन दिनानिमित्त रुग्णांना फळ वाटप करून त्यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना करणे, हा एक छोटासा प्रयत्न आहे. यापुढेही शिवसेना असे समाजोपयोगी उपक्रम राबवत राहील, असे आश्वासन यावेळी देण्यात आले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 19-06-2025














