रत्नागिरी : रस्त्यावर मोकाट गुरांचा तांडा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. त्यामुळे वाहनचालकांनी वाहन सावकाश चालवावे, अशा प्रतिक्रिया शहरात व ग्रामीण भागातून उमटत आहेत.
रत्नागिरी शहर आणि त्याच्यालगत असलेल्या मार्गावर मोकाट गुरांचा वावर वाढला आहे. पावसाळा संपताच पुन्हा ही मोकाट गुरे शहराकडे वळतात. याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. शिरगाव, भाट्ये, पावस रोड तसेच साळवी स्टॉप रस्त्यावर मोकाट गुरे दिवसा व रात्री बसलेली असतात. त्यावर तातडीने उपाययोजना करण्यात यावी या मागणीकडे मात्र दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांतून होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:49 14-10-2024









