रत्नागिरी : नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी स्पर्धेत ४७ नाटकांचे सादरीकरण

रत्नागिरी : अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा-रत्नागिरीने सुरू केलेल्या (कै.) नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्यस्पर्धेत ७ महिन्यांत ४७ नाटकांचे प्रयोग यशस्वी झाले. ग्रामीण व शहरी भागांतून उत्तम प्रतिसादात रंगलेली ही स्पर्धा १७नोव्हेंबर २०२४ ते ३१ मे २०२५ या कालावधीत रंगतदार झाली.

उत्सवी नाट्य स्पर्धेचे पहिले पुष्प तालुक्यातील गोळप येथील श्री हरिहरेश्वर देवस्थान मंदिरच्या रंगमंचावर रंगले होते. स्पर्धेत उतरलेल्या संस्था, स्पर्धेच्या निकालाची प्रतीक्षा करत आहेत. तालुका मर्यादित असलेल्या या स्पर्धेत ग्रामीण भागातील मंडळांनी सहभाग नोंदवला होता. परीक्षण रंगकर्मी अमेय धोपटकर, चंद्रशेखर मुळ्ये, संतोष सनगरे, नागेश बेर्डे, सुहास साळवी, रजनी सरदेसाई, पूर्वा खालगावकर, विजय पोकळे, अनुया बाम, विनायक जोशी, विनयराज उपरकर, पौर्णिमा साठे, सनातन रेडीज, पुरुषोत्तम केळकर, शैलेश चव्हाण यांनी परीक्षण केले होते.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:39 AM 19/Jun/2025