सेंट्रल बँक ऑफ इंडियामध्ये ४५०० पदवीधर अप्रेंटिस पदांची भरती; महाराष्ट्रात ५८६ जागा!

सेंट्रल बँक ऑफ इंडियाने २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी अप्रेंटिस ॲक्ट, १९६१ अंतर्गत ४,५०० अप्रेंटिस पदांवर पदवीधर उमेदवारांची भरती जाहीर केली आहे. बँकेच्या ह्यूमन कॅपिटल मॅनेजमेंट (रिक्रूटमेंट अँड प्रमोशन डिव्हिजन), सेंट्रल ऑफिस, मुंबई मार्फत ही भरती प्रक्रिया राबवली जात आहे. ही एक मोठी संधी असून, काही पदे दिव्यांग उमेदवारांसाठी राखीव ठेवण्यात आली आहेत. महाराष्ट्रात या भरतीसाठी एकूण ५८६ जागा उपलब्ध आहेत, ज्यात अनुसूचित जातीसाठी ५८, अनुसूचित जमातीसाठी ५२, इतर मागासवर्गीयांसाठी १५८, आर्थिकदृष्ट्या दुर्बळ घटकांसाठी ५९ आणि खुल्या प्रवर्गासाठी २५९ जागांचा समावेश आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

महाराष्ट्राव्यतिरिक्त, गुजरातमध्ये ३०५, आंध्र प्रदेशात १२८, कर्नाटकात १५, मध्य प्रदेशात ४५९, छत्तीसगडमध्ये ११४, तेलंगणात १०० आणि गोव्यात २८ जागांसाठी ही भरती होणार आहे. महाराष्ट्रातील जिल्ह्यांनुसार जागांचा तपशीलही उपलब्ध आहे. अहमदनगरमध्ये ६५, अकोल्यात २३, अमरावतीत ४४, छत्रपती संभाजीनगरमध्ये १५, जळगावमध्ये ४३, नागपूरमध्ये २९, नाशिकमध्ये २०, पुणे जिल्ह्यात ४७, सोलापूरमध्ये १४, ठाण्यात ३०, मुंबई उपनगरमध्ये २८, पालघरमध्ये ८, रत्नागिरीत ९, सिंधुदुर्गमध्ये ६, ग्रेटर मुंबईमध्ये ३२, रायगडमध्ये १५, बुलढाण्यात २२, वाशिममध्ये ११, यवतमाळमध्ये २२, बीडमध्ये ४, हिंगोलीत १, जालनामध्ये २, नांदेडमध्ये ४, परभणीत १, भंडारा ६, चंद्रपूरमध्ये ३, गडचिरोलीत १, गोंदियात २, वर्ध्यात ८, धुळे २४, नंदुरबार १८, कोल्हापूरमध्ये ६, लातूरमध्ये ५, उस्मानाबादमध्ये १, सांगलीमध्ये ५, सातारा जिल्ह्यात १४, नॉर्थ गोव्यात १२ आणि साऊथ गोव्यात १६ जागांचा समावेश आहे.

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ३१ मे २०२५ रोजी २० ते २८ वर्षांच्या दरम्यान असावे. आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादेत सवलत देण्यात आली आहे. इमाव उमेदवारांना ३१ वर्षे, अजा/अज उमेदवारांना ३३ वर्षे, तर दिव्यांग उमेदवारांना ३८ ते ४३ वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. तसेच, विधवा/परित्यक्ता/घटस्फोटीत महिला ज्यांनी पुनर्विवाह केलेला नाही, त्यांच्यासाठी खुल्या/ईडब्ल्यूएस प्रवर्गात ३५ वर्षे, इमावसाठी ३८ वर्षे आणि अजा/अजसाठी ४० वर्षांपर्यंत वयोमर्यादा आहे. शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलायचे झाल्यास, उमेदवारांनी ३१ मे २०२५ रोजी पदवी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. विशेष म्हणजे, १ जानेवारी २०२१ नंतर पदवी उत्तीर्ण केलेले उमेदवारच अर्ज करण्यास पात्र आहेत. उमेदवारांना ज्या राज्यासाठी अर्ज करायचा आहे, त्या राज्यातील स्थानिक भाषा अवगत असणे आवश्यक आहे.

निवड प्रक्रिया ऑनलाइन ऑब्जेक्टिव्ह टाईप लेखी परीक्षेवर आधारित असेल, ज्यात क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड, जनरल इंग्लिश, लॉजिकल ॲप्टिट्यूड, कॉम्प्युटर नॉलेज, बेसिक रिटेल लायबिलिटी/ॲसेट/इन्व्हेस्टमेंट/इन्शुरन्स प्रोडक्ट्स या विषयांवर आधारित एकूण १०० प्रश्न, १०० गुणांसाठी असतील आणि यासाठी ६० मिनिटांचा वेळ दिला जाईल. निवड झालेल्या अप्रेंटिसना एक वर्षाच्या ट्रेनिंग कालावधीत दरमहा १५,०००/- रुपये स्टायपेंड दिले जाईल. अर्ज शुल्क म्हणून दिव्यांग उमेदवारांना ४००/- रुपये भरावे लागतील. अजा/अज, इमाव, ईडब्ल्यूएस, दिव्यांग उमेदवारांनी आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी बँकेच्या www.centralbankofindia.co.in या संकेतस्थळावरील जाहिरातीमध्ये दिलेल्या नमुन्यातील सक्षम अधिकाऱ्याने दिलेले सर्टिफिकेट सादर करणे आवश्यक आहे.

ऑनलाइन अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी या अप्रेंटिसशिप पोर्टलवर आपले नाव रजिस्टर करणे अनिवार्य आहे. त्यानंतर लॉगइन करून ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख २३ जून २०२५ आहे. अधिक माहितीसाठी किंवा शंकासमाधानासाठी info@bfsissc.com या ईमेल आयडीवर संपर्क साधू शकता.