अभिनेता ओंकार भोजने चिपळूण स्वच्छतेचा ब्रँड अॅम्बेसिडर

चिपळूण : स्वच्छ भारत मिशन-शहरी अंतर्गत चिपळूण नगर परिषदेने एक महत्त्वाचा निर्णय घेत अभिनेता ओंकार भोजने याची स्वच्छतादूत, ब्रँड-अॅम्बेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. नगर परिषदेच्या वतीने प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांनी नियुक्तीपत्र दिले.

अभिनेता भोजने यानेही या नियुक्तीचा स्वाभिमानाने स्वीकार करीत सांगितले की, स्वच्छता ही केवळ सरकारची जबाबदारी नसून आपण सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. चिपळूणकरांसोबत हा उपक्रम अधिक प्रभावी करण्यासाठी मी पूर्ण योगदान देईन. शहरात स्वच्छतेसाठी जनजागृती उपक्रम राबवण्यात येणार असून त्यात ओंकार भोजने सहभाग घेणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:22 PM 19/Jun/2025