चिपळूण : तालुक्यातील उमरोली येथील शेतकऱ्यांना जनावरांना लसीकरण कसे करायचे, याबाबत प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. लसीकरण करताना, लस किती प्रमाणात द्यायची याचे प्रात्यक्षिक दाखवले.
यावेळी ग्रामपंचायत सदस्य रूपाली आरमरे, अशोक आरमरे उपस्थित होते. ज्ञानोबा घोडके यांनीही शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. जनावरे कुठल्याही आजाराला बळी पडू नयेत, यासाठी त्यांना लसीकरण करणे गरजेचे असते. यादृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात आला. यासाठी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:50 PM 19/Jun/2025














