सर्वोच्च न्यायालयात नोकरीची सुवर्णसंधी! प्रोग्रामर पदांसाठी भरती; वेतन ९२,००० रुपयांपर्यंत

नवी दिल्ली: देशाच्या सर्वोच्च न्यायालयात (Supreme Court of India) नोकरी करण्याची इच्छा बाळगणाऱ्या संगणक क्षेत्रातील पदवीधर आणि अनुभवी प्रोफेशनल्ससाठी एक मोठी संधी चालून आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ग्रुप-बी नॉन-गॅझेटेड प्रवर्गातील सिनियर आणि ज्युनियर प्रोग्रामर पदांसाठी थेट भरती प्रक्रिया जाहीर केली असून, एकूण २६ पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. या पदांसाठी निवड होणाऱ्या उमेदवारांना आकर्षक वेतन मिळणार आहे.

आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा

WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा

(जाहिरात क्र. Fw/ RC/ Sr & Jr. Programmer/sqsv दि. ०५.०६.२०२५)


पदांचा तपशील आणि वेतन

  1. सिनियर कोर्ट असिस्टंट कम सिनियर प्रोग्रामर – ६ पदे
    • वेतनश्रेणी: पे-लेव्हल ८ (मूळ वेतन रु. ४७,६००/- अधिक भत्ते, अंदाजे एकूण वेतन रु. ९२,०००/- दरमहा)
  2. ज्युनियर कोर्ट असिस्टंट कम ज्युनियर प्रोग्रामर – २० पदे
    • वेतनश्रेणी: पे-लेव्हल ६ (मूळ वेतन रु. ३५,४००/- अधिक भत्ते, अंदाजे एकूण वेतन रु. ७०,०००/- दरमहा)

आवश्यक पात्रता आणि वयोमर्यादा

  • ज्युनियर प्रोग्रामर (पद क्र. १): कॉम्प्युटर सायन्स/आयटी मधील बी.ई./बी.टेक. पदवी किंवा कॉम्प्युटर सायन्समध्ये बी.एससी. किंवा बॅचलर ऑफ कॉम्प्युटर अॅप्लिकेशन (BCA) पदवी आवश्यक.
    • वयोमर्यादा: ३० वर्षे.
  • सिनियर प्रोग्रामर (पद क्र. २): कॉम्प्युटर सायन्स/आयटी मधील बी.ई./बी.टेक. पदवीसह ६ वर्षांचा अनुभव, किंवा एम.सी.ए./एम.एससी. (कॉम्प्युटर सायन्स) पदवीसह ६ वर्षांचा अनुभव, किंवा किमान ६०% गुणांसह बी.एससी. (कॉम्प्युटर सायन्स)/बी.सी.ए. पदवी आणि ७ वर्षांचा अनुभव आवश्यक. कायदा विषयातील पदवी असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.
    • वयोमर्यादा: ३५ वर्षे.

(वयोमर्यादेत इतर मागासवर्गीय (इमाव) उमेदवारांसाठी ३ वर्षे, अनुसूचित जाती/जमाती (अजा/अज) साठी ५ वर्षे आणि अपंग उमेदवारांसाठी १० वर्षांची सूट असेल.)


निवड प्रक्रिया आणि अर्ज तपशील

दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड चार टप्प्यांमध्ये होईल:

  1. लेखी परीक्षा (ऑब्जेक्टिव्ह – जनरल इंग्लिश, जनरल अवेअरनेस, रिझनिंग)
  2. टेक्निकल अॅप्टिट्यूड टेस्ट (ऑब्जेक्टिव्ह)
  3. प्रॅक्टिकल अॅप्टिट्यूड टेस्ट
  4. मुलाखत

परीक्षा केंद्र: दिल्ली/एनसीआर, मुंबई, कोलकाता, हैदराबाद, बंगळुरू. (उमेदवारांना किमान दोन केंद्रांचा पसंतीक्रम द्यावा लागेल.)

अर्जाचे शुल्क:

  • खुला/इमाव प्रवर्ग: रु. १,०००/-
  • अजा/अज/माजी सैनिक/अपंग: रु. २५०/-

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी सर्वोच्च न्यायालयाच्या अधिकृत संकेतस्थळावर www.sci.gov.in भेट देऊन ऑनलाइन अर्ज सादर करावेत. ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत २७ जून २०२५ (रात्री ११:५५ वाजेपर्यंत) आहे.