पुणे : तंत्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्याने २०२५-२६ शैक्षणिक वर्षासाठी पोस्ट-एसएससी (दहावी नंतरचे) अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्षाच्या प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २६ जून २०१५ पर्यंत वाढवली आहे.
विद्यार्थ्यांना आवश्यक कागदपत्रे जसे की गुणपत्रके, जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला आदी मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे आणि अर्ज प्रक्रिया सुरळीत पार पडावी, या हेतूने ही मुदतवाढ केली आहे.
याबाबत माहिती देताना विद्या प्रतिष्ठानच्या पॉलिटेक्निक कॉलेज, इंदापूरचे प्राचार्य डॉ. सुजय देशपांडे म्हणाले की, या प्रवेश प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी, कागदपत्रांची अनलोडिंग, कागदपत्र पडताळणी, अर्ज निश्चिती ही सर्व प्रक्रिया २६ जून २०२५ पर्यंत पूर्ण करणे आवश्यक आहे. ही मुदतवाढ विद्यार्थ्यांना गुणपत्रक, जातीचा दाखला, नॉन-क्रिमीलेअर प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला यांसारखी आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी आणि संपूर्ण अर्ज प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी दिली आहे याचा लाभ घ्यावा.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:07 19-06-2025














