कोकणातील रत्नागिरी, रायगड जिल्ह्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे रायगड जिल्ह्यातील खेड आणि नागोठणे शहरांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. खेडमधील जगबुडी नदीने आणि नारंगी नदीने इशारा पातळी ओलांडली आहे.
आता नदीचे पाणी मार्केट परिसरात शिरले आहे.

खेडमध्ये जगबुडी नदीचे पाणी मटण मार्केटमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. खेड नगरपरिषद प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

रायगड जिल्ह्यात १३४ मिलीमीटर पाऊस नोंदवण्यात आला आहे. रायगडमधील शाळांना सुट्टी देण्यात आली आहे. अलिबाग, रोहा ,तळा, महाड पोलादपूर या तालुक्यांत मागील काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 19-06-2025














