जागतिक मल्लखांब दिनानिमित्त हर्णे येथे मल्लखांब स्पर्धा उत्साहात

दापोली : दापोली तालुका मल्लखांब असोसिएशन व सरखेल कान्होजी आंग्रे मल्लखांब संघ हर्णै यांच्या वतीने जागतिक मल्लखांब दिनानिमित्त आयोजित मल्लखांब स्पर्धा उत्साहात पार पडल्या.

या स्पर्धेला अध्यक्ष मनोज पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून प्रारंभ करण्यात आला.

14 वर्ष खालील मुले मल्लखांब या गटात अर्णव चव्हाण प्रथम, स्वराज दळवी द्वितीय, रूद्र सावंत तृतीय तर 18 वर्षाखालील मुले मल्लखांब वेदांत राणे प्रथम, आयुष्य जांभळे द्वितीय, युवराज भुवड, ओमकार इंदूलकर तृतीय तसा 12 वर्षाखालील मुली रोप मल्लखांब यामध्ये मनस्वी राणे प्रथम, वेदीका सहस्त्रबुद्धे द्वितीय, श्रेया पटवा, अनन्या नाईक तृतीय, 18 वर्षाखालील मुली रोप मल्लखांब गटात सिद्धी पटवा प्रथम, मानवी कुलाबकर द्वितीय तर पुजा राजभर हीने तृतीय क्रमांक पटकावला. तर लाठी काठी स्पर्धेत मुले या गटात ओमकार इंदूलकर प्रथम, रूद्र सावंत द्वितीय, मुलांया गटात दिक्षा चव्हाण प्रथम, सानवी जाधव द्वितीय क्रमांक पटकावला. स्पर्धेतील सर्व विजेत्या स्पर्धकांना प्रमाणपत्र स्मृतिािान्ह देवून सन्मानित करण्यात आले.

या कार्यक्रमात जिल्हा विधी सेवा समितीवर निवड झाल्याबद्दल मनोज पवार यांचा सत्कार करण्यात आला. या वेळी हर्णै पंचक्रोशी अध्यक्ष दिपक खेडेकर, हर्णै पाळंदे एकता विचार मंच अध्यक्ष भालचंद्र मुसलोणकर, दापोली तालुका मल्लखांब असोसिएशनो अध्यक्ष मनोज पवार, कार्याध्यक्ष मंगेश राणे, सरपंच ऐश्वर्या धाडवे, सुभाष गोळे, लवकुश पटवा, राजेश राजभर, दीपक चव्हाण, मनोहर सावंत, राजाभाऊ जाधव, गजानन जाधव, चंद्रकांत शेडगे, शेखर विलणकर, भरत जोशी, जेष्ठ नागरीक संघ हर्णै अध्यक्ष जगदीश देवरूखकर, मोहन चव्हाण, कमलेश कोळपे, प्रकाश चोपडे, हरिष सावंत, सोमनाथ गुरव, सखाराम येलकर, दिलीप गायकवाड, दिलीप गायकवाड, वैभव चौहान, मयुर मळेकर, चिन्मय गुरव, गौरव राणे यांनी सहकार्य केले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:15 19-06-2025