◼️ ७२ तासांसाठी अलर्ट जारी
रत्नागिरी : अरबी सागरात कमी दाबाचा पट्टा प्रभावशाली ठरणार असल्याने कोकण किनारपट्टी भागात पुढील ७२ तासांत विजांसह गडगडाटी पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या पावसाचा प्रभाव उत्तर कोकणसह उत्तर महाराष्ट्रातही राहणार असल्याने या भागात जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे रत्नागिरीसह पालघर आणि ठाणे जिल्ह्यात अवकाळी पावसाचे मळभ कायम राहणार आहे.
कोकण किनारपट्टी भागात ‘ऑक्टोबर हिट’वा प्रभाव सुरू झाला असताना रत्नागिरी जिल्ह्यात अवकाळी पावसाचे सातत्य राहिले आहे. त्यामुळे कोकणातील भात कापणीही खोळंबली होती. मात्र, रविवारपासून अवकाळी पावसाचा जोर कमी झाला असला तरी पुढील दोन दिवस जोरदार पावसाचा इशारा दिला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:21 15-10-2024









