नाशिक : शासनाकडून शिधापत्रिकेवर धान्य मिळविण्यासाठी शिधापत्रिका धारकांना रेशनकार्ड ई-केवायसी (Ration Card ekyc) प्रक्रिया बंधनकारक करण्यात आली होती. ३० एप्रिलपर्यंत त्यासाठी अंतिम मुदत दिली होती.
मात्र, मुदत संपल्यानंतरही राज्यातील अनेक शिधापत्रिकाधारकांची ई-केवायसी प्रक्रिया बाकी असल्याने अखेर शासनाकडून ई-केवायसीसाठी ३० जूनपर्यंत अंतिम मुदतवाढ दिली आहे.
मेरा-केवायसी ॲप वापरावे
ई-केवायसी करण्यासाठी शासनाने मेरा केवायसी ॲप विकसित केले आहे. या ॲपवर ओटीपीद्वारे इतर माहिती भरणे अनिवार्य आहे. सर्व माहिती भरून प्रक्रिया पूर्ण करणे आवश्यक आहे. या ॲपवर शिधापत्रिकाधारकांना आधार आधारित फेस व्हेरिफिकेशन करावे लागते. तसेच ओटीपी व्हेरिफिकेशनसाठी वापरकर्त्याला त्याचा आधार क्रमांक टाकावा लागेल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:26 19-06-2025














