रत्नागिरी : भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा, रत्नागिरीच्या वतीने सामाजिक बांधिलकी जपत प्रभाग क्रमांक १४ मध्ये छत्री वाटपाचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाळ्याच्या तोंडावर गरजू नागरिक आणि महिलांना आधार मिळावा या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात आला, ज्याला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
या कार्यक्रमाचे आयोजन भाजप महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष सौ. वर्षा ढेकणे यांच्या सौजन्याने करण्यात आले होते. “भारतीय जनता पार्टी केवळ निवडणुकांपुरती मर्यादित नसून, वर्षभर समाजाच्या सेवेसाठी आणि त्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध आहे. महिलांच्या हितासाठी व त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी भाजप महिला मोर्चा नेहमीच अग्रभागी राहील,” असे सौ. ढेकणे यावेळी म्हणाल्या.
या उपक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे, भारतीय जनता पार्टीचे कार्याध्यक्ष मा. श्री. रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते छत्र्यांचे अनावरण करण्यात आले. यावेळी श्री. चव्हाण यांनी भाजपच्या विविध समाजसेवा कार्याचा आढावा घेतला आणि उपस्थित नागरिकांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या सामाजिक कार्यक्रमामुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत भारतीय जनता पार्टीच्या या कार्यपद्धतीचे कौतुक केले.
याप्रसंगी जिल्हाध्यक्ष श्री. राजेश सावंत, श्री. प्रशांत डिंगणकर, शहराध्यक्ष श्री. दादा ढेकणे, महिला शहराध्यक्ष सौ. पल्लवी पाटील, तसेच श्री. विक्रम जैन, श्री. संदीप सुर्वे, श्री. निलेश आखाडे, श्री. अमित विलणकर, श्री. नितीन जाधव, श्री. गुरुप्रसाद फाटक, श्री. ज्ञानेश पोतकर, सौ. मनाली राणे, श्री. भास्कर सुतार सर, श्री. प्रतीक देसाई, श्री. संतोष सावंत, श्री. तुषार देसाई, श्री. सचिन गांधी, श्री. बबलू विलणकर, सौ. वैभवी शिवलकर, श्री. मुकुंद विलणकर, श्री. समीर वस्ता, सौ. प्रणाली रायकर, श्री. शैलू बेर्डे, श्री. प्रवीण रायकर, सौ. भक्ती दळी, सौ. सायली बेर्डे, श्री. मंदार खांडकर, सौ. सानिका शर्मा, श्री. अमेय घुडे, श्री. कमलाकर जोशी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
17:57 19-06-2025














