रत्नागिरी : झाडगाव येथील ‘मत्स्यालय’ प्रवेशासाठी डिजिटल शुल्क सेवा

रत्नागिरी : झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्रात मत्स्यसंग्रहालय आहे. त्या मत्स्यालयाला भेट देण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता डिजिटल पेमेंटची सुविधा केली आहे. ही सुविधा बुधवारपासून (ता. १८) सुरू झाली. संशोधन केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशीष मोहिते यांच्या हस्ते पीओएस मशीनचे उद्घाटन झाले.

झाडगाव येथे झालेल्या कार्यक्रमावेळी डॉ. स्वप्नजा मोहिते यांना डिजिटल पेमेंट प्रणालीद्वारे प्रथम तिकीट देण्यात आले. पर्यटकांना यूपीआय पेमेंट, डेबिट किंवा क्रेडिटकार्डद्वारे पैसे देता येणार आहेत. या सुविधेचा लाभघ्यावा, असे आवाहन वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशीष मोहिते यांनी केले आहे. डिजिटल पेमेंटकरिता आवश्यक पीओएस मशीन, भारतीय स्टेट बँक यांनी निःशुल्क पुरवल्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानण्यात आले आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:25 AM 20/Jun/2025