रत्नागिरी : स्मार्ट मीटर बसवण्याचे काम कुठेही थांबलेले नाही. काही भागांतील बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटरचे रीडिंग होत नसल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्याबाबत त्यांनी माहिती विचारली. त्या अनुषंगाने रत्नागिरी विभागातील काही भागातील गावे तसेच वाडी-वस्ती येथे मोबाईलचे नेटवर्क उपलब्ध नसल्याने सध्या तेथील रीडिंग कर्मचाऱ्यांमार्फत घेण्यात येत आहे.
तसेच त्या अडचणीमुळे सध्या स्मार्ट मीटर लावण्याचे काम पहिल्या टप्प्यात तालुक्याचे शहर व मोठे गाव जेथे मोबाईल नेटवर्क उपलब्ध आहे तिथे चालू आहे. ते पूर्ण केल्यानंतर पुढील टप्प्यात इतर भागांचे काम हाती घेण्यात येईल, अशी माहिती महावितरणने दिली आहे. स्मार्ट मीटर बसविण्याचे काम नियोजनानुसार प्रगतिपथावर आहे, असे महावितरण कंपनीने कळवले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:35 AM 20/Jun/2025














