चिपळूण : तालुक्यातील कुशिवडे येथे बिबट्याचा धुमाकूळ सुरू असून, येथील शेतकऱ्यांच्या गाई, बकऱ्या, वासरू यांना लक्ष्य करत असून, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी कुशिवडे गावचे सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांनी केली आहे.
संतोष गोसावी यांच्यासह सहकाऱ्यांचा गेल्या सहा वर्षांपासून शेळीपालन व्यवसाय सुरू असून, मे महिन्यापासून आतापर्यंत सलग चार बकऱ्या बिबट्याने फस्त केल्या आहेत. सुरेंद्र शिगवण, दत्ताराम शिगवण यांच्या गाय आणि वासराची शिकार केली आहे.
सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ कदम यांनी वनविभागाला दिली. वनपाल अश्विनी जाधव, पोलिसपाटील मोहिते, पशुसंवर्धन अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा केला. गावातील शेतकऱ्यांनी आपापल्या बकऱ्या, गुरांचे गोठे बंदिस्त केलेले असताना देखील बिबट्याचा जनावरांवर हल्ला दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असून, गावात भीतीचे वातावरणदेखील पसरले आहे. याची माहिती
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:30 PM 20/Jun/2025














