रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुखमध्ये पोलिसांनी कल्यान मटका जुगारावर छापा टाकून एका व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. ही कारवाई काल, १९ जून २०२५ रोजी सकाळी ११:१० वाजण्याच्या सुमारास देवरुख ते साखरपा रोडवर, मार्लेश्वर पेट्रोलपंपासमोर एका बंद टपरीच्या बाजूला चिंचेच्या झाडाच्या आडोशाला करण्यात आली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस कॉन्स्टेबल सचिन गोविंद लगारे (पोकॉ/९५, देवरुख पोलीस ठाणे) यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, दीपक सुरेश नटे (वय ४४, रा. पाटगाव नटेवाडी, ता. संगमेश्वर) हा बेकायदेशीरपणे कल्याण मटका नावाचा जुगार चालवत असल्याची माहिती मिळाली होती.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी तात्काळ छापा टाकला असता, दीपक नटे हा कल्याण मटका जुगाराचे साहित्य आणि रोख रकमेसह मिळून आला. त्याच्या ताब्यातून एकूण १०९२ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, ज्यात १०९० रुपये रोख रक्कम आणि इतर जुगार खेळण्याचे साहित्य यांचा समावेश आहे.
या प्रकरणी १९ जून २०२५ रोजी दुपारी १:४७ वाजता देवरुख पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार कायदा कलम १२ (अ) नुसार गुन्हा (गु.र.नं. ७०/२०२५) दाखल करण्यात आला आहे.
जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर अंकुश ठेवण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असून, अशा गैरकृत्यांविरुद्ध कठोर कारवाई सुरूच राहील, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:45 20-06-2025














