रत्नागिरी : शहरातील अभ्युदयनगर येथील बेघर निवारा केंद्रातील वृद्धाचा मंगळवार १७ जून रोजी जिल्हा शासकिय रुग्णालयात आकस्मिक मृत्यू झाला. याबाबत शहर पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
दिलीप रामचंद्र भोसले (६२, रा. अभ्युदय नगर, रत्नागिरी) असे आकस्मिक मयत झालेल्या वृद्धाचे नाव आहे. याबाबत बेघर निवारा केंद्र चालक शिवानी संदीप पवार (३९, रा. शिवाजीनगर, रत्नागिरी) शहर पोलिस ठाण्यात खबर दिली आहे.
त्यानुसार, दिलीप भोसले व त्यांची बहिण हे २०२३ पासून त्यांच्या निवारा केंद्रात दाखल होते. त्यांना पहिल्यापासून पॅरेलेसिसचा त्रास होता. दरम्यान १७ जून रोजी दुपारी ३ वा. दिलीप भोसले यांची बहीण त्यांना जेवायला उठवण्यासाठी गेली असता ते कोणतीच हालचाल करत नसल्याने खबर देणार यांनी त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिलीप भोसले यांना तपासून मृत घोषित केले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:44 PM 20/Jun/2025














