पावस : कृषी विभागातर्फे विविध खरीप मोहिमांचे आयोजन केले जात आहे. तरी जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी यात सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हाध्यक्ष कृषी अधिकारी शिवकुमार सदाफुले यांनी केले आहे.
यामध्ये प्रामुख्याने बीज प्रक्रिया मोहीम, कृषी निविष्ठांचा वापर, घरगुती चाचणी पद्धतीने बियाण्यांची उगवण क्षमता तपासणे, फळबाग लागवडीमध्ये सीआरए तंत्रज्ञानाचा वापर, जमीन सुपीकता निर्देशांक आधारे खतांचा वापर, कृषी निविष्ठांच्या वाजवी वापराबाबत जनजागृती मोहीम, हिरवळीच्या खतांची निर्मिती व वापर, कृषी विषयक माहिती तंत्रज्ञानाची साधने याबाबत माहिती देणे, खरीप पिकांच्या रोपवाटीका, भात शेती यांत्रिकीकरण मोहीम, पीक स्पर्धा आयोजन आदीबाबत मोहिमा राबविण्यात येत आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:51 PM 20/Jun/2025













