कोयना धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ


सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात धो-धो पाऊस कोसळत असल्याने कोयना धरणातीलपाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे.

गुरुवारी सायंकाळच्या सुमारास धरणात ३० टीएमसीवर पाणीसाठा झाला होता, तर अतिवृष्टीमुळे महाबळेश्वर-तापोळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणात दरड आली.

यामुळे रस्ता खचल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. त्याचबरोबर नवजा येथे आतापर्यंत ७०१ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे.

सायंकाळी पाचच्या सुमारास कोयनेत ४५ हजार १२१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. परिणामी धरणातील पाणीसाठा वेगाने वाढला.

पाच वाजता धरणात ३०.०६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. २८.५६ पाणीसाठ्याची टक्केवारी आहे.

किनारपट्टी भागात मोठ्या लाटा येण्याची शक्यता
◼️ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी आदी समुद्रकिनाऱ्यावर मोठ्या लाटा येण्याची शक्यता आहे.
◼️ त्यामुळे तेथील नागरिकांनी खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान खात्याच्या माध्यमातून करण्यात आले आहे. याबाबतची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
◼️ सिंधुदुर्ग जिल्ह्यासह ठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी या जिल्हह्यांच्या सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशारा जारी करण्यात आला आहे.
◼️ भारतीय हवामान विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार गुरुवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत ३.५ ते ३.८ मीटर उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता आहे.
◼️ या कालावधीत नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. लहान बोटींना समुद्रात न जाण्याचा स्पष्ट इशारा देण्यात आला असून मच्छिमारांनी समुद्रात उतरू नये.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:30 20-06-2025