दापोली : शासनाच्या विविध फळबाग लागवड योजने बरोबर स्वखर्चाने, शेतकरी काजूची लागवड करताना दिसत आहेत. दापोली तालुक्यात अशी फळबाग लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांना तालुका कृषी विभागातील कृषी अधिकारी प्रत्यक्ष भेट देत काजू रोपांची लागवड कशा पद्धतीने करावी हे तंत्रज्ञान मार्गदर्शन करत आहेत.
तालुक्यात आंबा लागवडी बरोबर काजू लागवडीकडे देखील शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. काजू लागवडीतून मिळणारे उत्पन्न पहाता तालुक्यात काजू लागवड होताना दिसत आहे. त्या मुळे ग्रामीण भागात काजू लागवडीतुन भविष्यात उत्पन्नात वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक बाजू ही चांगली होणार आहे. शेतकऱ्यांनी योग्य पद्धतीने काजूची लागवड करावी या साठी उप कृषी अधिकारी फणसू संतोष मांडवकर, सहायक कृषी अधिकारी फणसू प्रगती शिंदे यांनी कोंढे गावी जाऊन येथील शेतकरी यांना काजू लागवड तंत्रज्ञान मार्गदर्शन केले या वेळी शेतकरी विश्वनाथ दळवी, दशरथ जाधव, मारुती जाधव यांनी हे लागवड तंत्रज्ञान आत्मसात केले.
अन्य फळझाड लागवडी बरोबर काजू लागवडीतून देखील दरवर्षी चांगले उत्पन्न मिळते. पूर्वजांनी आणि वडिलांनी पीडिजात संभाळून ठेवलेल्या जमिनीत फळबाग लागवड केल्यास फायदेशीर होईल-विश्वनाथ दळवी, शेतकरी कोंढे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:32 PM 20/Jun/2025














