‘एचएसआरपी’ नंबरप्लेटसाठी तिसऱ्यांदा मुदतवाढ

राज्यात २०१९ पूर्वीच्या जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी पाटी (HSRP) बसवणं बंधनकारक केले आहे. यासाठी राज्यातील वाहनधारकांची गडबड सुरू आहे. पण, पाट्यांचा पुरवठा कमी असल्यामुळे नोंदणीमध्ये अडचणी येत आहेत.

यामुळे आता तिसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे.

दरम्यान, आता उच्च सुरक्षा क्रमांक नोंदणी पाटी लावण्यासाठी वाहनधारकांना १५ ऑगस्ट २०२५ पर्यंत मुदवाढ देण्यात आली आहे. राज्यात आतापर्यंत ३० टक्के वाहनधारकांनीच नोंदणी पाटी बसवून घेतली आहे. तर ही मुदतवाढ शेवटची असल्याचे विभागाने स्पष्ट केले आहे. या मुदतीमध्ये नोंदणी केली नाहीतर वाहनधारकांवर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा दिला आहे.

एक एप्रिल २०१९ पूर्वीची राज्यात दोन कोटी वाहने आहेत. या वाहनांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने केंद्र आणि राज्य सरकारच्या निर्देशामुसार परिहवन विभागाने फेब्रुवारी महिन्यापासून अंबलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे. आधी ३१ मार्च २०२५ पर्यंत मुदत देण्यात आली होती. यानंतर ही मुदत ३० एप्रिल केली.

दरम्यान, मधल्या काळात अपुरी केंद्रे, प्रशिक्षित कामगारांचा अभाव आणि इतर तांत्रिक त्रुटींचा अभाव असल्याने अनेकांना अडचणी आल्या. यामुळे पुन्हा एकदा परिवहन विभागाने ही मुदत ३० जूनपर्यंत वाढवली होती. पण, या नंबरप्लेट बसवून घेण्यात अजूनही वाढ झाल्याचे दिसत नाही. त्यामुळे आता प्रशासनाने आणखी मुदतवाढ दिली आहे. याबाबत मंत्री प्रताप सरनाईक यांच्याकडे मुदतवाढीची मागणी केली होती. यानंतर सरनाईक यांनी १५ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ केल्याचे जाहीर केले आहे. याबाबत परिवहन विभागाचे आयुक्तांनी निवेदन प्रसिद्ध केले आहे.

अशी असते एचएसआरपी

अ‍ॅल्युमिनियमपासून बनलेली

जाडी १ मिलीमीटरपेक्षा थोडी अधिक

क्रोमियम आधारित होलोग्राम स्टिकर आणि टॅम्पर-प्रूफ लॉक

होलोग्राम खाली लेझर बैंडेड १० अंकी पिन कोड असतो

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:49 20-06-2025