रत्नागिरी : हिंदी भाषेविषयी राजकीय पक्षांनी राजकारण करू नये, असे आवाहन हिंदी महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी आणि पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यासाठी महामंडळाचे प्रतिनिधी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनाही भेटणार आहेत.
राज्य शासनाच्या भाषाविषयक धोरण परिपत्रकाद्वारे तिसरी हिंदी भाषा अनिवार्य असल्याचा शब्द काढून सर्वसाधारण अशा शब्दांच्या प्रयोग केला आहे. राज्यात हिंदी भाषेसाठी राजकीय पक्षांनी राजकारण, गैरसमज करून घेऊ नये. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तीन भाषा शिकल्या पाहिजेत. गेले तीन वर्षे चर्चा चालू होती. राजकारण, गैरसमज करून घेऊ नये, यासाठी महाराष्ट्र राज्य हिंदी शिक्षक महामंडळाचे अध्यक्ष अनिलकुमार जोशी, उपाध्यक्ष ता. का. सूर्यवंशी, शिवाजीराव अडसूळ, पुरुषोत्तम पगारे, सचिव रामानंद पुजारी, रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मिलिंद कडवईकर, प्रशांत खेडेकर, राजेंद्र खांबे, अन्य पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ मनसे अध्यक्ष राज ठाकरे साहेब यांची मुलाखात घेऊन चर्चा करणार आहे.
महाराष्ट्रात १९६४ पासून कोठारी शिक्षण आयोगानुसार त्रिभाषा सूत्र राज्य शासनाने स्वीकारले आहे. महाराष्ट्रात भारतीय भाषा हिंदीचा वापर पूर्वीपासून केला जात आहे. हिंदी भाषेबाबत विवाद नको, हिंदी भाषा ऐच्छिक राहणार आहे, अशीही महामंडळाची भूमिका आहे. महाराष्ट्रात ग्रामीण दुर्गम, डोंगराळ भागात जपानी, जर्मनी, फ्रान्स, तेलगू, मल्यालम, कानडी, बंगाली भाषा छोट्या मुलांना झेपणार नाहीत. हिंदी भाषा, मराठी भाषा, देवनागरी लिपी एकच आहे. त्यामुळे हिंदी भाषेचा अभ्यास विद्यार्थी तातडीने आत्मसात करू शकतात. पहिली ते पाचवीपर्यंत तिसरी भाषा विद्यार्थ्यांना आत्मसात करता येईल. भारतीय हिंदी भाषेचे आवश्यकता आहे. हिंदी भाषेसाठी राजकारण, गैरसमज करून घेऊ नये.
राज्य शासनाच्या या परिपत्रकाचे महाराष्ट्र राज्य शिक्षक महामंडळाने स्वागत केले आहे. दरम्यान, महामंडळाच्या अध्यक्षांसह प्रतिनिधींनी यासंदर्भात राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण विद्या परिषदेचे संचालक, उपसंचालक, बालभारतीच्या हिंदी भाषा अधिकारी श्रीमती अलका पोतदार यांच्याशी चर्चा केली.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:28 20-06-2025













