गरिबांच्या मुलांनी इंग्रजी भाषा शिकावी, हे BJP-RSS ला नकोय : राहुल गांधी

Rahul Gandhi on BJP-RSS : काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी शुक्रवारी(दि.२०) भारतीय जनता पक्ष (BJP) आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS) वर इंग्रजी भाषेवरुन जोरदार हल्ला चढवला.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’ वर एक व्हिडिओ पोस्ट करत म्हटले की, ‘भारतातील गरिबांच्या मुलांनी इंग्रजी शिकू नये, असे भाजप आणि आरएसएसला वाटते.’

इंग्रजी भाषेचे महत्त्व अधोरेखित करताना राहुल गांधी म्हणतात, ‘इंग्रजी हे धरण(अडथळा) नाही, तर एक पूल आहे. इंग्रजी लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही, तर ती एक शक्ती आहे. इंग्रजी ही साखळदंड नाही, तर ती साखदंड तोडण्याचे साधन आहे. आजच्या जगात इंग्रजी ही व्यक्तीच्या मातृभाषेइतकीच महत्त्वाची आहे. ही भाषा केवळ रोजगाराच्या संधी निर्माण करत नाही, तर आत्मविश्वासही वाढवते.’

प्रत्येकाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे
राहुल गांधींनी यावेळी भारतीय भाषांचे महत्त्वही अधोरेखित केले. ते म्हणाले, ‘भारतातील प्रत्येक भाषेत आत्मा, संस्कृती, ज्ञान आहे. आपण त्यांचे पालनपोषण केले पाहिजे. प्रत्येक मुलाला इंग्रजी शिकण्याची समान संधी मिळाली पाहिजे. जागतिक स्पर्धेत भारताला मजबूत बनवण्याचा आणि देशातील प्रत्येक मुलाला समान व्यासपीठ उपलब्ध करून देण्याचा हाच मार्ग आहे,’ असे त्यांनी म्हटले.

राहुल गांधींचा भाजप आणि आरएसएसवर हल्ला
राजकीय विश्लेषक राहुल गांधींच्या या विधानाकडे भारतीय राजकारणात शिक्षण आणि भाषेवरुन सुरू असलेल्या वादाच्या संदर्भाने पाहत आहेत. विरोधी पक्ष बऱ्याच काळापासून आरोप करत आहे की, केंद्र सरकार शिक्षण आणि भाषेद्वारे सामाजिक समानतेच्या कल्पनेला मागे टाकत आहे. काँग्रेसचा दावा आहे की, भारतातील गरीब आणि मागासवर्गीयांना समाजातील उच्च वर्गाला मिळणाऱ्या शिक्षण आणि भाषेच्या सुविधा मिळत नाहीत. आता भाजप आणि आरएसएसवर थेट टीका करून राहुल गांधींनी असा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे की, गरिबांना इंग्रजीपासून वंचित ठेवणे म्हणजे त्यांना संधींपासून वंचित ठेवण्याचा एक मार्ग आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
16:34 20-06-2025