नवी दिल्ली, २१ जून २०२५: स्टाफ सिलेक्शन कमिशन (SSC) ने पदव्युत्तर पदवीधर उमेदवारांसाठी केंद्र सरकारच्या विविध मंत्रालये, विभाग आणि कार्यालयांमध्ये ज्युनियर ट्रान्सलेटर, ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर, ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर, सिनियर हिंदी ट्रान्सलेटर, सिनियर ट्रान्सलेटर आणि सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) या ‘ग्रुप-बी (नॉन-गॅझेटेड)’ पदांवर भरतीसाठी ‘कंबाइंड हिंदी ट्रान्सलेटर परीक्षा – २०२५’ ची घोषणा केली आहे. या परीक्षेची अधिसूचना ५ जून २०२५ रोजी जाहीर करण्यात आली.
आमच्या नोकरी विषयक WhatsApp ग्रुपमध्ये सामील होण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा
WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हा
पदांचा तपशील:
- ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर (JTO): सेंट्रल सेक्रेटरिएट ऑफिशियल लँग्वेज सर्व्हिस (CSOLS) आणि आर्म्ड फोर्सेस हेडक्वार्टर्स (AFHQ) मध्ये पदे उपलब्ध.
- ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर / ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर / ज्युनियर ट्रान्सलेटर: केंद्र सरकारची विविध मंत्रालये, खाती आणि ऑफिसेस.
- सिनियर हिंदी ट्रान्सलेटर (SHT) / सिनियर ट्रान्सलेटर (ST): केंद्र सरकारची विविध मंत्रालये, खाती आणि कार्यालये.
- सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर): सेंट्रल रिझर्व्ह पोलीस फोर्स (CRPF) मध्ये पदे.
रिक्त पदांची संख्या: अंदाजे ४३७ पदे भरली जाणार असून, नेमकी संख्या योग्यवेळी जाहीर केली जाईल.
वेतनश्रेणी:
- ज्युनियर ट्रान्सलेशन ऑफिसर / ज्युनियर ट्रान्सलेटर / ज्युनियर हिंदी ट्रान्सलेटर / सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) (पे-लेव्हल – ६): अंदाजे रु. ७०,०००/- दरमहा.
- सिनियर हिंदी ट्रान्सलेटर / सिनियर ट्रान्सलेटर (पे-लेव्हल – ७): अंदाजे रु. ८७,०००/- दरमहा.
शैक्षणिक पात्रता (दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी): सर्व पदांसाठी, उमेदवाराकडे हिंदी किंवा इंग्रजी विषयात पदव्युत्तर पदवी असणे आवश्यक आहे. पदवी स्तरावर हिंदी आणि इंग्रजीपैकी एक विषय अभ्यासलेला असावा किंवा पदवीचे माध्यम संबंधित भाषा असावी. याशिवाय, हिंदीतून इंग्रजी किंवा इंग्रजीतून हिंदीमध्ये ट्रान्सलेशन पदविका/सर्टिफिकेट कोर्स उत्तीर्ण असणे किंवा केंद्र/राज्य सरकारमधील २ वर्षांचा ट्रान्सलेशनचा अनुभव आवश्यक आहे.
सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) पदासाठी शारीरिक मापदंड:
- उंची: पुरुष – १८५ सें.मी. (अनुसूचित जमाती – १६२.५ सें.मी.); महिला – १५५ सें.मी. (अनुसूचित जमाती – १५० सें.मी.).
- छाती (फक्त पुरुष): ७७-८२ सें.मी. (अनुसूचित जमाती – ७६-८१ सें.मी.).
- सिनियर हिंदी ट्रान्सलेटर पदासाठी ३ वर्षांचा अनुभव आवश्यक आहे.
वयोमर्यादा: सब-इन्स्पेक्टर (हिंदी ट्रान्सलेटर) पदासाठी दि. २६ जून २०२५ रोजी, तर इतर पदांसाठी दि. १ ऑगस्ट २०२५ रोजी ३० वर्षांपर्यंत.
निवड प्रक्रिया:
- पेपर-१ (CBT): १२ ऑगस्ट २०२५ रोजी संगणक आधारित वस्तुनिष्ठ बहुपर्यायी परीक्षा होईल. यात जनरल हिंदी (१०० प्रश्न, १०० गुण) आणि जनरल इंग्लिश (१०० प्रश्न, १०० गुण) असे २०० गुणांचे प्रश्न असतील. वेळ २ तास. (प्रत्येक चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण वजा केले जातील). पेपर-१ मधील गुणवत्तेनुसार उमेदवार पेपर-२ साठी निवडले जातील.
- पेपर-२ (वर्णनात्मक): २०० गुणांचा हा पेपर ट्रान्सलेशन आणि निबंध लेखनावर आधारित असेल. यात हिंदीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून हिंदीमध्ये भाषांतरासाठी प्रत्येकी एक उतारा तसेच हिंदी आणि इंग्रजीमध्ये प्रत्येकी एक निबंध लिहावा लागेल. वेळ २ तास.
परीक्षा केंद्रे: अमरावती, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, जळगाव, मुंबई, नागपूर, नाशिक, पुणे, पणजी इत्यादी शहरांमध्ये परीक्षा केंद्रे उपलब्ध असतील.
परीक्षा शुल्क: रु. १००/- (ऑनलाइन पद्धतीने २७ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत भरता येईल).
अर्ज करण्याची अंतिम तारीख: ऑनलाइन अर्ज https://www.ssc.gov.in या संकेतस्थळावर २६ जून २०२५ रोजी रात्री ११ वाजेपर्यंत करता येतील. अधिक माहितीसाठी SSCWR च्या ७७३८४२२७०५/ ९८६९७३०७०० या क्रमांकावर संपर्क साधा.
ही केंद्र सरकारच्या प्रतिष्ठित पदांवर काम करण्याची एक सुवर्णसंधी आहे. आपण या भरतीसाठी पात्र आहात का?













